शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2017 (13:51 IST)

सर्व मुस्लीम बंदी नाही मात्र निर्णय योग्य - ट्रम्प

सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली गेली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत. सर्वच स्तारातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे तर अनेक ठिकाणी त्याच्या विरोधात निदर्शने होत आहेत.  मात्र ट्रम्प हे निर्णयावर ठाम आहे असे दिसून येत आहे. तर  हा निर्णय योग्य असून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. आहे. ते पुढे म्हणाले की   सर्व मुस्लिमांवरील बंदी नसून त्यातून कट्टरतावादी मुस्लीम व दहशतवाद्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे कितीही टीका झाली तर या काही देशातील मुस्लीम बंदी निर्णय मागे घेणार नाही असे चिन्ह आहेत.