testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमेरिकेचा आयएसवर सर्वात मोठा हल्ला, काय म्हणाले ट्रंप...

वॉशिंग्टन| Last Modified शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (11:04 IST)
अमेरिकी सेनेने गुरुवारी
अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला आहे. हल्ल्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले की त्यांनी अफगाणिस्तात बॉम्बहल्लाची परवानगी दिली होती आणि त्यांनी या मोहिमेला यशस्वी प्रकारे पार पाडले. पेंटागॉनचे प्रवक्ते एडम स्टम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानच्या सीमेजवळ ननगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात इसिसचे बोगदे आणि बंकर असलेल्या परिसरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला. अफगाणिस्तानमधून इसिसचा पूर्ण सफाया करेपर्यंत अमेरिका सैन्य कारवाई करीत राहणार असल्याचेही अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

‘मदर आॅफ आॅल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह आॅर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे. या हल्ल्याने किती हानी झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही.


यावर अधिक वाचा :