शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (22:20 IST)

सलूनमध्ये हेअर ड्रायरमध्ये स्फोट झाल्याने अपघातात दोघे गंभीर ,व्हिडीओ व्हायरल

अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात.असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ एका सलूनचा आहे.यामध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे.यानंतर न्हावी हेअर ड्रेसर घेऊन येतो आणि तो केसांवर वापरू लागतो.अचानक मोठ्या आवाजाने हेअर ड्रायरला स्फोट होऊन आग लागते.हे पाहून न्हावी  हेअर ड्रायर सोडून पळून गेला आणि बघता बघता संपूर्ण दुकानात आग आणि धुराचे लोट पसरले. 
 
ही घटना बांगलादेशमध्ये या वर्षी जुलैमध्ये घडली होती.मात्र त्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.वोसा टीव्हीच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, ही घटना कच्छापूरच्या नारायणगंज भागातील आहे.यानुसार या अपघातात ग्राहक आणि न्हावी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 
ही घटना जरी जुनी असली तरी हेअर ड्रायर वापरणाऱ्यांसाठी हा धडा ठरू शकतो.हेअर ड्रायरला आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही.एसी गॅस लिक झाल्यामुळे आग लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे .तर ,काही लोकांचे म्हणणे आहे की, न्हाव्याने ग्राहकाच्या डोक्यावर लावलेल्या द्रवाने हेअर ड्रायरला आग लागली.