शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (16:48 IST)

क्यूबात असाही होतो कंडोमचा वापर

सध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्यूबात असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत मॉडेलच्या केंद्रीयकृत आर्थिक व्यवस्थेच्या कारणांमुळे दुकांनामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूचा अभाव आहे. मूलभूत वस्तूच्या कमतरतेमुळे त्यांनी कंडोम पासून रोजच्या वापराच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. केसांचे रबर, फुगे, पाण्यावर तरंगणारे फ्लोट या वस्तूंसाठी कंडोमचा वापर केला जातो.
 
नाईलाजाने केसाच्या रबर बॅन्डसाठी कंडोमचा वापर करावा लागतो. तसेच लहान मुलं वाढदिवसाच्या सजावटीसाठी कंडोमचे फुगे बनवून ते उडवतात. समुद्र किनारी वापरले जाणारे फ्लोट यांना बाधण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी देखील आता कंडोमचा वापर केला जातो.