गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (18:05 IST)

US: कार्यकाळ संपण्यापूर्वी, बिडेन यांनी भारतासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही आठवडे उरले आहेत. आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी बिडेन यांनी भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. या संरक्षण करारांतर्गत भारताला अमेरिकन कंपन्यांकडून MH-60R मल्टी-मिशन हेलिकॉप्टरची महत्त्वपूर्ण संरक्षण उपकरणे मिळणार आहेत, ज्यामुळे भारताची सुरक्षा मजबूत होईल. या कराराची किंमत अंदाजे $1.17 अब्ज आहे. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी अमेरिकन काँग्रेसलाही आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

भारताला प्रमुख संरक्षण उपकरणे विकण्याचा बिडेन सरकारचा निर्णय त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या काही दिवस आधी आला आहे. या निर्णयामुळे भारताला दिलासा मिळाला आहे कारण जर बिडेन प्रशासनाने या कराराला मान्यता दिली नसती तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळण्यास आणखी वेळ लागू शकला असता. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. 

या करारांतर्गत अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिन आणि मिशन सिस्टीम्सकडून संरक्षण उपकरणे पुरवली जातील. या शस्त्रास्त्रांच्या विक्री आणि तांत्रिक मदतीसाठी 20 अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कंपन्यांचे 25 प्रतिनिधी भारताला भेट देतील.
Edited By - Priya Dixit