शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (22:07 IST)

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय 'पेंटागन' मेट्रो स्टेशनजवळ गोळीबारानंतर बंद, फोर्स प्रोटेक्शन एजन्सीला अलर्ट पाठवण्यात आला

Pentagon in Lockdown: अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमधील हालचाली मंगळवारी सकाळपासून बंद करण्यात आल्या आहेत. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो बस प्लॅटफॉर्मजवळ गोळीबाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. घटनेनंतर लगेच पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीला अलर्ट पाठवण्यात आला. त्यातील सर्व अधिकाऱ्यांना इमारतीच्या आतच राहण्यास सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, किंवा बंदूकधारीला अटक करण्यात आली आहे की नाही हे देखील माहित नाही.
 
मंगळवारी सकाळी 11 वाजता (स्थानिक वेळेनुसार), पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सी (PFPA) ने ट्वीट केले, "पेंटागॉन ट्रान्झिट सेंटरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पेंटागॉन सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. आम्ही लोकांना या भागात येऊ नये असे सांगितले आहे. अधिक तपशील लवकरच येतील. 'मेट्रो स्टेशन आणि बस स्टॉप पेंटागॉन इमारतीच्या बाहेर (पेंटागॉन मेट्रो स्टेशन) स्थित आहेत. अशा परिस्थितीत, मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा तपासणीतून जावे लागते.