शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

यूएईत ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नाही

यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या प्रवाशांना दुबई आणि अबुधाबीमध्ये ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नसेल. यूएईच्या शहरांमध्ये भारतीय पर्यटक आणि प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. यासाठी याचा सर्वात जास्त फायदा भारतीय प्रवाशांना होणार आहे. युनायटेड अरब अमीरात (यूएई) कॅबिनेटनं हा निर्णय घेतलाय.

ट्रान्जिट पॅसेंजर्सला ४८ तासांसाठी फ्रीमध्ये व्हिजा मिळणार आहे. त्यानंतर काही काळासाठी त्यांना व्हिजा वाढवून घ्यायचा असेल तर त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या फीमध्येही कपात करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांच्या पैशांची बचतच होणार आहे. प्रवाशांना फ्री दोन दिवसांनंतर आणखीन दोन दिवस व्हिजाची मुदत वाढवायची असेल तर त्यांच्याकडून केवळ ५० दिरहम म्हणजेच जवळपास ९३० रुपये आकारले जातील. हे ट्रान्जिट व्हिजा सर्व यूएई एअरपोर्टवर बनवल्या गेलेल्या पासपोर्ट कंट्रोल हॉलमध्ये एक्सप्रेस काऊंटर्सवरून मिळवता येतील.