शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2017 (09:55 IST)

अमेरिकेत मुस्लीम समजून भारतीयांचे स्टोर जाळण्याचा प्रयत्न

अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी भारतीय समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे.
 
फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने भारतीय अमेरिकन्सना मुस्लीम समजून त्यांचे स्टोर जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव रिचर्ड लॉयड असल्याचे सांगितले जात आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतून अरबी लोकांना पळवून लावायचे असल्याचे तो म्हणाला.
 
न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी म्हणजे 10 मार्च रोजी सकाळी घडलेली आहे. सेंट ल्युसिया कौंटी मधील शेरिफ मस्कारा यांनी सांगितले की, एका 64 वर्षीय व्यक्तीने स्टोरला आग लावण्याचा प्रयत्न केला. त्याचे कारण म्हणजे स्टोरचा मालक मुस्लीम असल्याचे त्याला वाटले होते.
 
अरबी लोकांना अमेरिकेतून पळवून लावायचे असल्याचे तो म्हणाला होता. त्यासाठी त्याने एक डम्प्सटर (कचराकुंडी) पोर्ट सेंट लुईस स्टोर समोर ढकलल्यानंतर त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. आरोपी रिचर्डवर फर्स्ट डीग्रीचा चार्ज लावला आहे.