शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (12:16 IST)

आश्चर्य..! 12 वर्षानंतर मुलींची होतात मुले

या जगात तुम्हाला कधी-कधी काही आश्चर्यकारक ऐकायला मिळते. परंतु डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये असलेल्या एका गावाची कथा थक्क करणारीच आहे. या गावात जन्मलेली प्रत्येक मुलगी काही वर्षानंतर मुलगा बनते. हे वाचून विश्वास बसणार नाही, पण हेच खरे आहे.
 
सेलिनास हे या गावाचे नाव आहे. येथे प्रथम मुलगी जन्माला येते. यानंतर 12 वर्षानी तिचे मुलामध्ये परिवर्तन होते. हे विचित्र वाटते पण सत्यही आहे. येथे मुलींची किशोरवयापर्यंत मुले बनतात. काही वर्षापूर्वी या गावातील मुलांना एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. या आजारामुळेच मुली मोठय़ा होताच मुले बनतात. येथील मुलींचे जन्मताच लिंग खूपच छोटे असते. तसेच यावरुन ती मुलगी आहे का मुलगा? हे समजणे कठीण होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की गरोदरपणाच्या वेळी आनुवंशिक विकारामुळे गर्भस्थ शिशुला एंजायम न मिळाल्यामुळे होते. यामुळे डिहायड्रो टेस्टोस्टेरोन सेक्स हार्मोन व्यवस्थित तयार होत नाहीत. तर 12 वर्षानंतर हे लिंग व्यवस्थित तयार होते. यामुळे 12 वर्षानंतर मुली बनतात मुले!