शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इटली , गुरूवार, 25 ऑगस्ट 2016 (11:52 IST)

इटलीत शक्तिशाली भूकंप; 161 जण मृत्युमुखी

स्थानिक वेळेनुसार 3 वाजून 36 मिनिटांनी झालेल्या शक्तिशाली भूकंपात इटलीमध्ये 161 जण मृत्युमुखी पडले. या भूकंपात 368 नागरिक जखमी झाले आहेत, तसंच ढिगाऱ्याखाली शेकडो लोक दबले गेल्याची भीती आहे. याची तीव्रता 6.2 रिश्टर इतकी होती.

भूकंपात उमब्रिया, मार्चे लाजिओसह इटलीतील मोठा भाग उद्धस्त झाला आहे. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. बचावकार्यही युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. पुन्हा भूकंप येण्याची शक्यता असल्याने शेकडो नागरिकांनी आपत्कालीन छावण्यांचा आश्रय घेतला आहे.