शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:07 IST)

इसिसविरोधात अमेरिकेची रशियाला साद

क्वालालंपूर,- ‘इस्लामिक स्टेट’विरोधातील (आयएस) लढ्यांमध्ये सर्व जगाने एकत्र येण्याचे आवाहन करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियालाही एकत्र येण्याची साद घातली आहे. मात्र, सिरीयाचे अध्यक्ष बशर अल असद यांचा पाठिंबा रशियाने काढण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
तुर्कस्तानसह आशियाच्या नऊ दिवसांच्या दौर्‍याच्या अखेरच्या दिवशी ओबामा यांनी हे आवाहन केले आहे.