शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (12:33 IST)

कचरा वेचणार्‍या मुलीला सौंदर्याचे खिताब

मनात ठरवलं की कोणतंही काम अवघड नसतं, कसं ही करून व्यक्ती आपलं मुक्काम गाठतं. अशीच कहाणी आहे 17 वर्षांच्या खानिट्‌टा मिन्ट फासिएंग हिची. हिने मिस अनसेंसर्ड न्यूज थायलंड 2015 हा खिताब जिंकला. 


 
हा खिताब जिंकणारी खानिट्टाची आई थायलंडमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते. ‍जेव्हा ‍मुलीने ब्यूटी क्वीनचा मुकुट आपल्या आईच्या पायाशी ठेवला तर ती भावुक होऊन गेली. मिन्ट हिने स्पर्धा जिंकून घरी परतल्यानंतर आईच्या पाया पडून तिचे आभार मानले. त्यावेळी तिची आई रस्त्यावर कचरा वेचण्याचे काम करत होती. 
 
मिन्ट पत्रकारांशी बोलताना म्हणाली की यात लाजण्यासारखे काही नाही. ती माझी आई आहे. ती प्रामाणिकपणे आपलं काम करत आहे. तिने खूप मेहनतीने मला मोठ केलं. मिन्टने सांगितले की ती पण कचरा वेचण्यात आईची मदत करायची. ती म्हणाली की पुढेही आई सफाईचे कार्य करत राहील, कारण ती माझ्याकडून मदत घेऊ इच्छित नाही. 
 
मिन्टला कोणीतरी सल्ला दिला होता की तिने थायलंडच्या या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हायला हवे. पण ती स्पर्धा जिंकेल असा विचार कधीही केला नव्हता. मिन्ट म्हणाली की विजेतीची घोषणा झाल्यावर तिला सर्वकाही स्वप्नात घडतंय असं वाटत होते. ती म्हणाली की मी केवळ आपल्या आईमुळे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले.
 
सध्या मिन्टचे कुटुंब गरिबीत जीवन जगत असून तिला पैशांच्या तंगीमुळे कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायला समस्या येत आहेत. तसेच आता मिन्टला अॅडव्हरटायझिंग, चित्रपट आणि टिव्हीच्या ऑफर येण्याची शक्यता आहे. अशाने तिच्या घरची परिस्थिती बदलू शकते. पण तरीही तिची आई काम करत राहणार आहे, असे मिन्टने सांगितले.