शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (15:58 IST)

चिनची जाणीवपूर्वक पाकशी गट्टी!

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानच्या पहिल्याच भेटीत पाकिस्तानशी तब्बल ५१ करार केले आहे. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया भागाशी सबंधित करार करुन चीनने भारताला शह देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. 
 
शी जिनपिंग यांनी पाक व चीन या दोन देशातील जवळीक वाढविणाºया पाक- चीन आर्थिक कॉरिडॉरचे उद्घाटन केले. यामुळे चीन व पाकिस्तान यांच्यातील अंतर कमी होणार असून चीनकडून ऊर्जा उत्पादनासाठी साहित्य आयात करणे पाकला सोपे जाणार आहे.