शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:47 IST)

जेव्हा ओबामा वाढप्याचे काम करतात..

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन नागरिकांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचं अनोखं दर्शन घडलं. वॉशिंग्टन डीसीमधील चर्चमध्ये अनाथ आणि निराधार लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बराक ओबामा यांनी चक्क वाढप्याचं काम केलं. या खास कार्यक्रमात बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल आणि त्यांच्या दोन्ही मुलीही सहभागी झाल्या होत्या. 
 
युद्धात आपले नातेवाईक गमावलेल्या निराधार लोकांसाठी अमेरिकेत खास आभारप्रदर्शनाचा (थँक्सगिव्हिंग) कार्यक्रम केला जातो. यात खुद्द अध्यक्ष ओबामा सहभागी झाल्याने या लोकांच्या चेहर्‍यावरही एक वेगळा आनंद वाहत होता.