शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: थायलंड , बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:11 IST)

ट्टानी समुद्रकिनारा बॉम्बस्फोटांनी हादरला

पट्टानी समुद्रकिनारा दोन बॉम्बस्फोटांनी हादरला. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारली नाही. थाडलंडमधल्या बंडखोरांनीच हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पहिला बॉम्बस्फोट दक्षिणी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पार्किंग लॉटमध्ये झाला आहे. दुसरा बॉम्बस्फोट ट्रकमध्ये झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर 30हून अधिक जण जखमी झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच थायलंडमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 4 जणांचा मृत्यू आणि डझनांहून अधिक जण जखमी झाले होते. थायलंडला पर्यटनाच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळतं असल्यामुळेच हे हल्ले करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.