शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: काठमांडू , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:38 IST)

दहशतवादाचा बिमोड करायला हवा-नरेंद्र मोदी

मुंबईवरील 26/11च्या सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झालीत. या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क परिषदेत उपस्थित केला. दहशतवादाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांनी दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. त्यासाठी सार्क देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी नेपाळमधील सार्क परिषदेत केले.
 
मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला अन्य सार्क देशांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केला. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा उल्लेख मोदी यांनी टाळला. पाकिस्तानसाठी हा कठोर इशारा असल्याचे बोलले जात आहे. 
 
दरम्यान, सार्क देशांच्या समस्या आणि विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर मोदींनी दिला. सार्क देशांमध्ये आपापसातील सहकार्य, व्यापार आणि दळणवळण वाढण्याची गरज मोदींनी यावेळी व्यक्त केली.
 
पुढे वाचा मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
> दहशतवादाचा उखडून टाकण्यासाठी सार्क देशांनी एकत्र यावे.
> दक्षिण आशियाई विद्यापीठाची निर्मितीसाठी प्रयत्न
> सार्क देशांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर
> भारतीय गुंतवणुकदारांच्या माध्यमातून तरूणांसाठी रोजगाराची निर्मिती
> सार्क देशांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर मिटवण्यावर भर
> भारतातील पायाभूत सुविधांचा विकासावर भर
> पायाभूत सुविधा ही सार्क देशांपुढील महत्वपूर्ण समस्या आहे.
> आपल्याला भूतकाळ विसरुन पुढे जायला हवे
> सार्क देश समान समस्यांचा सामना करतायेत