शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: काठमांडू , गुरूवार, 5 मार्च 2015 (19:33 IST)

धुक्यामुळे धावपट्टीवर विमान घसरले

त्रिभुवनदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड धुके असल्याने टर्किश एअरलाइनचे विमान उतरत असताना अपघात झाला. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. 
 
दाट धुक्यामुळेहे विमान दुसर्‍यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी टर्किश एअरलाइनचे अ३३० हे विमान उतरत होते. धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात उतरणे धोकादायक असल्याने 
वैमानिकाने दुसºयांदा हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला असता अपघात झाला. विमानातील २३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.