शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By WD|
Last Modified: आबुजा , मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:05 IST)

नायजेरियामध्ये स्फोट; 71 ठार

नायजेरियाची राजधानी आबुजामध्ये सोमवारी   सकाळी बसस्थानकात झालेल्या दोन स्फोटांत 71 ठार तर  124 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी  दिली. न्यानयान पुलाजवळील बस स्थानकातील एका  बसमध्ये स्फोटके होती. यास्फोटामुळे सुमारे 30 बस  जळून खाक झाल्या आहेत. स्फोटानंतर भेदरलेल्या  नागरिकांनी धावपळ सुरू केली. यावेळी झालेल्या  चेंगराचेंगरीमध्येही अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली.

स्फोट झाला तेव्हा बसस्थानकावर शेकडो प्रवाशी होते. त्यामुळे मोठ्यासंख्येने लोक जखमी झाले आहेत. त्यांची  काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या  वाढण्‍याची भीती वर्तवण्यात आली आहे. स्फोटानंतर  घटनास्थळी चार फुटाचा खड्डा पडला आहे, यावरून स्फोट  किती शक्तीशाली होता याचा अंदाज बांधता येईल. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने  स्विकारलेली नाही.