शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: क्योटो , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (11:17 IST)

पंतप्रधान मोदींचा जपान दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जपान दौर्‍यामध्ये पहिला करार वाराणसीच्या विकासाबाबात झाला. क्योटोच्या धर्तीवर वाराणसीचा विकास करण्यासंबंधीच्या करारावर भारतीय राजदूत आणि क्योटोच्या महापौरांनी सह्या केल्या. भारतामध्ये  स्मार्ट सिटी बनविण्याच्या प्रकल्पाला वाराणसीपासून प्रारंभ झाला आहे. 
 
मोदी पाच दिवसांच्या जपान दौर्‍यासाठी शनिवारी ओसाका एअरपोर्टवर पोहोचले. तेथून ते थेट क्योटो येथे गेले. जपानचे पंतप्रधान शिंजो अँबे स्वत: त्यांच्या स्वागतासाठी क्योटोमध्ये उपस्थित होते. येथे त्यांनी पंतप्रधानांसाठी खास मेजवानी आयोजित केली होती.
 
नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अँबे यांना विवेकानंदांची पुस्तके आणि भगवद्गीता भेट दिली. 
 
या दौर्‍यात मोदी स्वत:च क्योटो या जपानच्या स्मार्टसिटीची पाहणी करून विकास व इतर सोयी सुविधांची माहिती घेणार आहेत. मोदी सरकारने भारतात 100 स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या क्योटो भ्रमणाचा याच्याशी संदर्भ जोडला जात आहे.
 
व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौर्‍यावर गेले आहेत. या दौर्‍यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षी संबंध अधिक दृढ होतील, तसेच देशांमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार होणार आहेत.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.