1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , सोमवार, 22 डिसेंबर 2014 (12:01 IST)

पाकमध्ये ४ दहशतवाद्यांना फाशी

पेशावर येथील शाळेत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या पाकिस्तान सरकारने आणखी चार दहशतवाद्यांना फैसलाबाद येथील तुरुंगात फाशी दिली.  सरकारने फाशीवरील बंदी उठविल्यानंतर देण्यात आलेली ही दुसरी शिक्षा असून दुसरीकडे पाक लष्कराकडून दहशतवाद्यांवरील हल्लेही सुरु आहेत.

शुक्रवारी पाक सरकारने अकील उर्फ डॉक्टर उस्मान व अर्शद मोहम्मद या दोघांना फैसलाबाद तुरुंगातच फाशी दिली होती. त्यानंतर लगेचच  झुबैर अहमद, रशिद कुरेशी , गुलाम सरवर भट्टी, अखलक अहमद यांना फासावर लटकाविण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्धार केला असून , मृत्युदंडाच्या शिक्षेवरील बंदी उठवून पाऊल उचलले आहे.