शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लाहोर , गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (13:16 IST)

पाकमध्ये ५ दहशतवाद्यांना फाशी

पेशावरमधील हल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडलेल्या पाकिस्तान सरकारने आणखी पाच दहशतवाद्यांना फासावर लटकाविण्यात आले.

झेलम जिल्ह्यात चिनाब नदीवरील लष्करी ठाणे व मुल्तान येथील आयएसआयच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप या दहशतवाद्यांवर होता. उमर नदीम, असिफ इद्रीस, अहसान अझीम, अमीर युसूफ व कामरान अशी या कैद्यांची नावे आहेत.