शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (15:58 IST)

पाकिस्तान हे अतिरेक्यांचे नंदनवन, अमेरिकेची स्पष्टोक्ती

पाकिस्तान हे अतिरेक्यांचे नंदनवन असल्याची स्पष्टोक्ती अमेरिकेने दिली आहे. मात्र, अमेरिका व पाकिस्तान या दोन्ही देशांना अतिरेक्यांचा मोठी धोका आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद्याविरुद्ध पाक सैन्य मोठ्या ध्येर्याने लढा देत असल्याचेही असे पेंटॅगॉनचे माध्यम सचिव रिअर ऍडमिरल जॉन किर्बी यांनी म्हटले आहे.  
 
पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांचे मोठे आव्हान आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या देशामधील अतिरेक्यांविरोधात कारवाई केली आहे, पाकिस्तान, अमेरिका आणि अफगाणिस्तान या तीनही देशांसमोरील दहशतवादाच्या समान आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अतिरेक्यांविरोधात कारवाई करण्‍यासाठी पाकिस्तानसोबत आणखी काम करण्याची इच्छा असल्याचेही किर्बी यांनी यावेळी म्हटले आहे.