शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: इस्लामाबाद , सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:24 IST)

पाकिस्तानमध्ये बस-ट्रकची भीषण टक्कर, 41 ठार

पाकिस्तानमधील सुक्कुर जिल्ह्यात रविवारी बस आणि ट्रकची भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 41 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुक्कुर जिल्ह्यातील पानो अकील गावाजवळ हा भीषण अपघात झाला. बसमध्ये 50 प्रवासी होते. ही धडक एवढी भीषण होती, की बसचालकाचा ताबा सुटला आणि बस खड्ड्यात कोसळली. बसमधील 41 प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला. त्यात बस चालकाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.