शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य तीन ग्रहांचा शोध

पॅरिस : पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य असलेल्या तीन ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. या ग्रहांचा आकार आणि तापमान काही प्रमाणात पृथ्वी तसंच शुक्रासारखंच असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे.
त्यामुळे या तिन्ही ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
 
हे ग्रह पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष दूर आहेत. अत्यंत थंड असलेल्या बटू ताऱ्याभोवती हे ग्रह परिभ्रमण करत आहेत. बेल्जियमचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ मायकल गिलन आणि त्यांच्या टीमने हा ग्रहांचा शोध लावला आहे. नव्याने सापडलेल्या या तिन्ही ग्रहांचा आकार पृथ्वीएवढंच असू शकतं. तसंच वातावरणही सारखं असावं, या शोधामुळे जीवसृष्टीबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांना गती मिळण्याचा अंदाज आहे.