शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्लीज! घरी जा, देशासाठी खूप सेक्स करा...

कोपनहेगन- नॉर्डिक कंट्रीजमध्ये डेन्मार्क असा देश आहे जिथली लोकसंख्या कमी होत आहे. यामुळे येथील सरकार देशातील लोकांना लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. लोकांना जास्तत जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी अर्थातच त्यासाठी सेक्स करण्यासाठी विभिन्न प्रस्ताव दिले जात आहे.
 
एवढंच नव्हे तर डेन्मार्क आपल्या कर्मचार्‍यांना अधिकृतपणे सुट्टी देत आहे. आर्थिक लाभांश देऊन देशासाठी लोकसंख्या वाढवण्याचा आग्रह करत आहे. आपल्या कमी होत असलेल्या लोकसंख्येमुळे सरकार काळजीत पडली आहे. याच कारणामुळे सेक्सला भरपूर प्रोत्साहन दिले जात आहे.
 
उल्लेखनीय आहे की डेन्मार्क जन्म दरात कमी आली आहे. येथे जन्मदर 1.7 पर्यंत पोहचली आहे, या कारणामुळेच सरकारला हे पाऊल उचलावे लागले. येथे सरकार लोकसंख्या वाढवण्यासाठी टीव्हीवर जाहिरात देत आहे. ज्यात जनतेशी भावनात्मक अपील केली जात आहे की प्लीज घरी जा, मुलं जन्माला घाला आणि देशाची लोकसंख्या वाढवा. असं वाटतं आहे की काही दिवसाने सरकार जास्तत जास्त मुलं जन्माला घालणार्‍यांना बक्षीसही देईल.