शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , बुधवार, 4 मार्च 2015 (14:54 IST)

फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी श्रीमंत भारतीय

मुकेश अंबानी पुन्हा एकदा सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती 21 अब्ज डॉलर असून, जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे स्थानही एका घराने वर सरकले आहे. तर जगातील श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. 
 
गेट्स यांची संपत्ती 79.2 अब्ज डॉलर आहे. गेल्या 21 वर्षात सोळाव्यांदा बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
 
‘फोर्ब्स’ने 2015 वर्षासाठी 90 श्रीमंत भारतीयांची यादी प्रसिद्ध केली. त्यात मुकेश अंबानी पहिल्या स्थानी (जागतिक स्थान 39), औषध उद्योगपती दिलीप संघवी दुसर्‍या स्थानी (जागतिक स्थान 44, संपत्ती 20 अब्ज डॉलर), तर अझीम प्रेमजी तिसर्‍या स्थानी (जागतिक स्थान 48, संपत्ती 19.1 अब्ज डॉलर) आहेत. अनिल अंबानी यांची संपत्ती चार अब्ज डॉलर असून, त्यांचा यादीत 418वा क्रमांक आहे.