शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (10:39 IST)

बिल क्लिंटनवर होत हाता ‘कौटुंबिक हिंसाचार’

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना त्यांची पत्नी हिलरींकडून जबर मारहाण होत होती. असा दावा ‘द क्लिंटन्स वॉर   ऑन वूमेन्स’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
 
हिलरी या बिल क्लिंटनना रक्त येईपर्यंत मारायच्या, जड वस्तूने हल्ला करायच्या, बोचकारायच्या असा मारहाण करायच्या असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. राजकीय रणनीतिकार असणार्‍या रॉजर स्टोन यांनी ‘द क्लिंटन्स वॉर आॅन वूमेन्स’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकात हा खळबळजनक दावा केला आहे.
 
या पुस्तकाबाबत बोलताना स्टोन यांनी हिलरींचा खरा चेहरा पुढे आणला आहे. ते म्हणतात, हिलरी यांनी गेल्या काही दिवसांत आपण सभ्य आहोत, असे ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव चंचल असून त्यातून त्यांना संताप येतो. त्या बिल यांना आणि आपल्या कर्मचार्‍यांना मारहाण करीत.