शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

बेनझीर यांना शोकाकूल वातावरणात निरोप

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांना आज हजारो चाहत्यांच्या गर्दीत अतिशय शोकाकूल वातावरणात निरोप देण्यात आला.

निरोपावेळचा नमाज पढण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. त्यात बेनझीर यांचे नातेवाईक, हितचिंतक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्षाचे कार्यकर्ते, नेतेही हजर होते.

न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार हफीझ हकीम अली मांगी यांनी या विधीचे पौरोहित्य केले. मौलाना मेहमूद अहमद भुट्टो यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनीच बेनझीर यांचे वडिल, माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यावरील अंत्यसंस्काराचे विधी केले होते.

वडिलांच्या कबरीशेजारीच बेनझीर यांचे दफन करण्यात आले.