शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: याऔंडे , सोमवार, 28 जुलै 2014 (16:28 IST)

बोको हरमतर्फे उपपंतप्रधानांच्या पत्नीचे अपहरण

बोको हरम या कट्टर इस्लामी संघटनेच्या दहशतवाद्यांनी कॅमरुनच्या उपपंतप्रधान अमाडो अली यांच्या पत्नीचे  अपहरण केल्याची घटना घडली आहे.  दहशतवाद्यांनी रविवारी एका हल्ल्यानंतर अमाडो अली यांच्या पत्नीचे अपहरण केल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. या हल्ल्यात जवळपास 10 जणाचा मृत्यू झाला आहे.

'सिन्हुआ'च्या माहितीनुसार, कॅमरुनचे सूचना मंत्री इस्सा त्चिरोमा बाकारी यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. इस्लामी समूहाने नायजेरियाच्या सीमावर्ती भागालगतच्या उत्तरी शहरात कोलोफाटामध्ये असलेल्या उपपंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी, दहशतवाद्यांनी अली यांच्या पत्नीला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. 
दुसरीकडे, दहशवाद्यांनी सेइनि बोऊकर या धार्मिक नेत्याचेही अपहरण केल्याचे समजते.

पश्चिम आफ्रिकेत नायजेरिया हा कॅमरूनचा शेजारी देश आहे. कॅमरून गेल्या अनेक दिवसांपासून बोको हरम या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या विविध हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे.