शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (11:09 IST)

ब्रिटिश वृत्तपत्राची कूरापत; मुंबईचा उल्लेख बॉम्बे

एका ब्रिटिश वृत्तपत्राने जुन्या कढीला उकळी देण्याचा प्रयत्न करत मुंबईच्या अस्मितेची खपली काढली आहे. मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करणार असल्याचे स्पष्ट करुन 'दि इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी कूरापत करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
मुंबईत बहुभाषिक मराठी लोकसंख्या असल्याने त्यांच्या बोलीभाषेतून मुंबई असा शहराचा उल्लेख अनेकदा येत असल्याने शिवसेनेने ब्रिटीशांनी ठेवलेल्या बॉम्बेला विरोध केला. त्यानंतर १९९५ पासून बॉम्बेचा मुंबई असा उल्लेख करण्यात येऊ लागला. मात्र येथे सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या बंदराचे शहर आहे. तसेच, जगासाठी गेट वे आॅफ इंडिया खुले आहे, असे अमोल राजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईचा उल्लेख पुन्हा 'बॉम्बे' असाच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.