शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग , शनिवार, 23 जानेवारी 2016 (11:00 IST)

भारतासोबत चिनी लोकांना नकोय मैत्री

भारत आणि चीनची मैत्री वाढविण्याच्या प्रयत्नांदम्यान आलेल्या नव्या सर्वेक्षणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बहुतेक चिनी लोकांना भारतासोबत संबंध अधिक वाढविले जावेत असे वाटत नाही. शेजारी म्हणून पाकिस्तान आणि नेपाळला महत्त्व दिले जावे, असे त्यांचे मत आहे. चिनी लोक सीमावाद असणारे देश भारत आणि जपानसोबत घनिष्ठ संबंधांच्या विरोधात असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. 
 
इंटरनेटचा वापर करणा-या २० हजार लोकांदरम्यान चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सद्वारे करविण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक १३१९६ लोकांनी जपानपासून दूर राहण्याची इच्छा वर्तविली. जर शेजारी बनण्याची कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया असेल तर चीनच्या सीमेपासून जपानला दूर ठेवले जावे, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्या अन्य देशांपासून दूर राहण्याची इच्छा चिनी लोकांनी वर्तविली आहे त्यात फिलिपाईन्स, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, भारत, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. 
 
द्वितीय जागतिक युद्धादरम्यान जपानी लष्कराद्वारे चिनी लोकांवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या घटना चीनच्या लोकांच्या डोक्यात ठाण मांडून आहेत. याच प्रकारे सीमावाद आणि तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांना आश्रय देण्यामुळे चिनी लोकांमध्ये भारताची नकारात्मक प्रतिमा बनली आहे. दक्षिण-पश्चिम विश्व विद्यालयातील राजकारण आणि कायदा विभागाचे उपसंचालक सून लिझोऊ यांच्यानुसार याच विचारसरणीमुळे भारत आणि चीनदरम्यान १२०००० चौरस किलोमीटर भागाबाबत वादाचा मुद्दा कायम राहिला असावा आणि अजूनपर्यंत दोघांमध्ये कोणताही मैत्री करार झाला नसावा. 
 
भारताची चीनला लागून असलेल्या ३४४८ किलोमीटर लांब सीमेबाबत दीर्घकाळ वाद कायम आहे. अरुणाचल प्रदेशाचा मोठा हिस्सा आपला असल्याचा चीनचा दावा आहे तो त्याला दक्षिण तिबेटचा भूभाग ठरवितो; परंतु अलिकडच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये थोडा सुधार आला आहे. 
 
नेपाळला अधिक पसंती 
पाकिस्तानबाबत चिनी लोक खूपच सकारात्मक आहेत. एकूण ११८३१ जण त्याला चांगला शेजारी मानतात हीच स्थिती नेपाळबाबत आहे. वृत्तपत्राने सर्वेक्षणात ३६ देशांची नावे देऊन त्यांच्यासोबतच्या संबंधांबाबत लोकांकडे विचारणा केली होती.