शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:12 IST)

मुंबई हल्लयामागे पाकिस्तानच

२६-११च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असून, त्याची अंमलबजावणीही पाकिस्तानतच झाली आहे. लष्कर-ए-तोयबानेच हा हल्ला केला असून आता पाकिस्तानने अधिक वेळ न दवडता दहशतवाद्यांना कडक शिक्षा करावी, असा घरचा आहेरच पाकच्या ‘एफआयए’चे (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) माजी प्रमुख तारिक खोसा यांनी दिला आहे.

खोसा यांची प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे.  बेनझीर भुत्तो हत्या प्रकरण, मेमोगेट ही महत्त्वाची प्रकरणे त्यांनीच हाताळली असून, त्यानंतर २६-११च्या मुंबई हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही पाक सरकारने त्यांच्यावर दिली होती.

दरम्यान, या हल्ल्याशी लष्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले असून, पाक सरकारने याची कबुली द्यावी, सत्य स्वीकारावे व आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करावा, असे त्यांनी पाकिस्तानला सांगितले आहे.