1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:54 IST)

युध्दनौकांची येमेनकडे कुच

सौदी अरेबियाने येमेनवर सुरु केलेल्या हवाई हल्यानंतर त्याठिकाणी युध्द भडकल्याने तेथील भारतीय असुरक्षित असल्याने त्यांना भारतात आणण्यासाठी विमानांबरोबरच युध्दनौकांनीही कुच केली आहे. काल एअर इंडियाचे विमान तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी गेले असून तेथील हवाईपट्टी वापरण्यासाठी या विमानाला तीन तासांची परवानगी मिळाली आहे.
 
त्याचबरोबरच दोन युध्दनौकांनीही प्रस्थान केले आहे. या जहाजांना सुरक्षित ठेवण्यासाठी आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश या विनाशिकाही रवाना झाल्या आहेत. येत्या काही काळाच्या अवधीतच तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यात येईल, अशी माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल पी.मुरुगेशन यांनी दिली.