शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पोर्ट ब्लेअर , शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (11:14 IST)

विश्व साहित्य संमेलनास आज सुरुवात

प्रा. शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज अंदमानच्या भूमीत आॅफबीट डेस्टिनेशन व महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या विश्व संमेलनास प्रारंभ होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष व खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे राज्यपाल (निवृत्त) लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई-चौघडा, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी निघेल. तेथील मराठी भाषिक नागरिक व साहित्यप्रेमी मराठमोळ्या पोषाखात सहभागी होणार आहेत.