शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , मंगळवार, 17 जानेवारी 2012 (14:07 IST)

व्यायाम करा, पगार वाढवा!

PIB
तुमचा पगार वाढत नाही, कामावर बढती मिळत नाही, तर मग त्यावर चांगला उपाय म्हणजे रोज व्यायाम करा, हमखास बढती मिळेल. जर तुम्हाला हे ज्योतिष, भविष्य असे काही वाटत असेल, तर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय! अमेरिकेतील एका सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.

'आरोग्यम् धनसंपदा' या संस्कृत उक्तीचा साक्षात अनुभव करीअर करू इच्छिणार्‍या तरुणांना येत आहे. दररोज व्यायाम केल्याने तुमचे शरीर फिट राहील इतकेच नाही, तर तुमच्या पगारातही घसघशीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते. अमेरिकेतील क्लीवलँड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. जर तुम्ही जॉगिंग, स्विमिंग अथवा वेट लिफ्टिंग करती असाल, तर तुमचा पगार 9 टक्के वाढू शकतो, असे या अहवालात म्हटले अहे. जर तुम्ही नियमित चालण्याचा व्यायाम करीत असाल तर त्याचा तुमच्या नोकरकीवर आणि पगारावर सकारात्मक प्रभाव पडतो.

या सर्व्हेसाठी त्यांनी जवळपास 12 हजारांहून अधिक लोकांना प्रश्‍न विचारले आहेत आणि दोन प्रकारात त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात लोकांना त्यांचा पगार आणि व्यायाम यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यानुसार, आठवड्यात तीन वेळा व्यायाम करणार्‍या व्यक्तीचा पगार सहा ते नऊ टक्क्यांपर्यंत वाढतो,असे लक्षात आले. त्याचवेळी बिल्कुल व्यायाम न करणार्‍या व्यक्तींचा पगार मात्र 'जैसे थे' होता.