शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कराची , सोमवार, 27 एप्रिल 2015 (11:33 IST)

सबीन महमूद यांची पाकिस्तानात हत्या

पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या सबीन महमूद यांची कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
 
एक परिसंवाद संपल्यानंतर त्या आपल्या आईसमवते घरी परत असताना दोन बंदूकधार्‍यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आईही गंभीर जखमी झाल्या आहेत.