कंपनीला हेही प्रश्न विचारा
एखाद्या कर्मचार्याला कामावर ठेवण्यापूर्वी कंपनी त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेते किंवा त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करुन घेते. त्याच प्रमाणे आता कंपनीने एखाद्या कामासाठी तुमची नियुक्ती केल्यानंतर कंपनीलाही काही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. (1)
तुमच्या कामाचा कालावधी काय असेल? (2)
जर रुग्णालयात तुम्हाला नोकरी मिळाली असेल तर त्या रुग्णालयात कशा स्वरुपाचे रुग्ण येतात? (3)
तुम्हाला कामाचे नियोजन कसे कारावे लागेल? (4)
तुम्ही ज्या कर्मचार्याच्या जागी कामावर आला आहात त्यापूर्वी कर्मचार्याने नोकरी का सोडली? (5)
किती दिवसांपासून हे पद रिक्त आहे? (6)
माझी निवड करण्यात आली तर माझे काम कशा स्वरुपाचे असेल? (7)
किती महिन्यानंतर तुमची कामाची वेळ बदलेल? (8)
वर्षातून किती वेळा तुमच्या कामाची पडताळणी केली जाईल, त्याची प्रक्रिया काय आहे? (9)
रुग्णालयात नर्सिंगला किती महत्त्व दिले जाते? (10)
रुग्णांना कोणताही सल्ला देण्याची परवानगी कर्मचार्यांना आहे का? (11)
आपल्या कंपनीचे फायदे आणि तोटे? (12)
माझ्याकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा? (13)
उल्लेखनीय काम केल्यानंतर कंपनीची माझ्याकडूनची अपेक्षा? (14)
माझे काम 10 तासांचे असेल का 12 तासांचे? (15)
कर्मचार्यांच्या सुरक्षिततेविषयी कंपनीचे विचार काय आहेत? (16)
जेवणाची सुटी किती मिनिटांची असते? (17)
रजेचा अर्ज भरण्याची पद्धत? वर्ष भरात मिळणार्या रजा? (18)
तुम्ही नेमके कोणाचे आदेश ऐकायचे? (19)
भविष्यात कंपनीचा दृष्टीकोण काय असेल? (20)
नोकरी सोडताना करावयाच्या फॉर्मलिटीज काय?