Widgets Magazine
Widgets Magazine

आयपीएल मधील स्वप्नवत प्रवास - नीतीश राणा

मुंबई, मंगळवार, 2 मे 2017 (09:23 IST)

nitish rana

यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत 9 सामन्यांत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 285 धावा काढल्या आहेत. कोणत्याही युवा खेळाडूसाठी स्वप्नवत म्हणावा, असा माझा आयपीएलमध्ये प्रवास सुरू आहे. मागील स्थानिक हंगाम माझ्यासाठी फारसा चांगला ठरला नव्हता. गेल्या वर्षी दिल्लीत स्थानिक क्रिकेट खेळत असताना माझ्या एका मित्राने मला आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सकरिता निवड झाल्याचे सांगितले. पण माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. हा फार मोठा संघ असल्यामुळे मी अजिबात अशी अपेक्षा केली नव्हती. मुंबईसाठी मैदानावर उतरलो, तेव्हा जणू स्वप्न सत्यात उतरल्याचीच अनुभूती मला आली. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता माझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे. यावर अधिक वाचा :
Widgets Magazine

यावर अधिक वाचा :