मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

IPL 2020
दुबई| Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (13:45 IST)
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली कॅपिटल्सविरुध्द आज (शनिवारी) होणार्या आयपीएलच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वलस्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर दिल्लीचे गणित बिघडू शकते.
चेन्नईच्या कोलकातावरील विजयामुळे मुंबईचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. त्यांचे 16 गुण झाले आहेत व धावगतीही चांगली आहे. त्यांचा संघ अव्वल दोनमध्ये कायम राहणे जवळजवळ निश्चित आहे. दिल्लीचे 14 गुण असून त्यांचा संघ तिसर्याल स्थानी आहे.

सलग तीन पराभव झाल्याने दिल्लीचा संघ खडबडून जागा झाला असून त्यांना सामन्यातील कोणताही ढिलेपणा महगात पडू शकतो. त्यांना प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज आहे. त्यांचे मुंबई व बंगळुरूशी उर्वरित दोन सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने गमवल्यास दिल्लीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते.
स्नायू दुखावल्याने नियमित कर्णधार रोहित शर्मा सलग चौथ्या सामन्यातही बाहेर राहू शकतो. मात्र, मुंबईकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. मुंबईने मागील सामन्यात बंगळुरूला पराभूत केले आहे ते दिल्लीविरुध्द अडचणी उभ्या करू शकतात.

मुंबईचे फलंदाज व गोलंदाज आपल्या परीने पूर्णपणे योगदान देत आहेत. याच्या विरोधात मागील काही सामन्यांमध्ये दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी संघासाठी अनुकूल झालेली नाही. हैदराबादविरुध्दच्या सामन्यात त्यांचे फलंदाज खूपच दबावाखाली दिसून आले. कगिसो रबाडा व एन्रिच नॉर्त्जे चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना साथ मिळत नाही.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी जुळले एक नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आज (शुक्रवार) सुरू होत आहे. सुमारे 8 ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडला पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमचे सहा सदस्य क्राइस्टचर्चमध्ये आइसोलेशन ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी अचूक उत्तर दिले
आयपीएल २०२० मध्ये पाचव्या वेळी मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनवणार्‍या रोहित शर्मा आणि विराट ...

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

कोरोनातही बीसीसीआय मालामाल
आयपीएलच्या तेराव्या हंगामात 4 हजार कोटींची कमाइ

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ...

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री ...