रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (12:49 IST)

दोन महत्त्वाचे खेळाडू यूएईत दाखल मुंबई इंडियन्सचे बळ वाढले

आयपीएलचा तेराव्या हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबरपासून यूएईत या स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. गतविजेत मुंबई इंडियन्सच्या ताकदीत आता अजून वाढ होणार आहे. कारण संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आणि यंदा मुंबईकडून खेळणारा शेर्फन रुदरफोर्ड हे यूएईत दाखल झाले आहेत.
 
कॅरेबिअन प्रीमिअर लिग स्पर्धेत खेळल्यानंतर पोलार्ड आणि रुदरफोर्ड हे दोन्ही खेळाडू आपल्या परिवारासोबत यूएईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या आगमनाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
 
कायरन पोलार्ड याचे फॉर्मात असणे मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर मानले जाते. कॅरेबिअन प्रीमिअर लिग स्पर्धेत पोलार्डच्या त्रिंबागो नाईट राडर्स संघाने विजेतेपद मिळवमले आहे.
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. पोलार्डने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा किताब पटकावला आहे. त्यामुळे मुंबई इंडिन्सकडून खेळतानाही पोलार्डने आपला फॉर्म कायम राखल्यास संघाला त्याचा फायदा होईल.