मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 7 एप्रिल 2021 (17:39 IST)

आयपीएलमध्ये ‘हे' स्टार फलंदाज भोपळाही न फोडण्यात आहेत आघाडीवर

आयपीएल स्पर्धेत धावांचा, षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात फलंदाज कायमच डॉमिनेटिंग असतात. पण, या डॉमिनेटिंग फलंदाजांच्या नाकात दम करणारी जात म्हणजे अव्वल गोलंदाज. या गोलंदाजांनी अशा भल्या- भल्या स्टार फलंदाजांना भोपळाही फोडू दिलेला नाही.
 
या यादीत सर्वाधिक 13 वेळा शून्यावर बाद होणार फलंदाजांची संख्या  ही चार आहे. पहिल्या स्थानावरच या चार फलंदाजांमध्ये आयपीएल गाजवलेले फलंदाजही आहेत. पण, खेळलेल्या डावांचा निकष पकडला तर हरभजन सिंग 88 डावात 13 वेळा भोपळा मिळवून अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पार्थिव पटेलने 137 डावात 13 वेळा बदक मिळवले आहे. त्यानंतर अजिंक्य रहाणेही आपल्या 140 डावात 13 वेळा शूनवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत षटकार आणि टी-20 मध्येही मोठे मोठे शंभर करण्याची ख्याती रोहित शर्माही सर्वाधिक भोपळे मिळवणार्यांेच्या संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. तो 195 डावांत 13 वेळा एकही धाव न करता बाद झाला आहे.
 
या यादीत दुसर्याव स्थानावर विराजमान होण्यासाठी पहिल्या स्थानापेक्षाही जास्त चुरस दिसते. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा भोपळाही न फोडू शकणार्यांच्या यादीत दुसर्या  स्थानावर तब्बल 5 खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या यादीत पीयूष चावला (81 डावांत 12 वेळा) हा एकमेव गोलंदाज आहे. बाकीचे चार खेळाडू हे अव्वल फलंदाज म्हणून गणले जातात. यात गौतम गंभीर (152 डाव 12 वेळा), मनदीप सिंग (91 डावांत 12 वेळा), मनीष पांडे (135 डावांत 12 वेळा), अंबाती रायडू (151 डावांत 12 वेळा) या चांगल्या फलंदाजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीतील 9 खेळाडूंमध्ये फक्त 2 खेळाडू हे प्रमुख गोलंदाज आणि मग फलंदाज आहेत.