गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (18:13 IST)

IPL 2023: मुंबईला धक्का, जोफ्रा आर्चर उर्वरित सामन्यांमधून बाहेर

आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, याआधीच रोहितच्या पलटणला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिटनेसच्या समस्येमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पाचवेळा चॅम्पियन मुंबईने सांगितले की आर्चर आपल्या देशात इंग्लंडला परतणार आहे आणि तो इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या देखरेखीखाली असेल. यासोबतच आर्चरच्या बदलीची घोषणाही मुंबईने केली आहे.
 
मुंबईने सांगितले की, आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर ईसीबीकडून लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो घरी परतेल. मुंबईने आर्चरच्या जागी इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनला संघात स्थान दिले आहे. जॉर्डनला मुंबईने दोन कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. जॉर्डन याआधी चेन्नई सुपर किंग्जकडून गेल्या मोसमात खेळला होता. त्याला यॉर्कर स्पेशालिस्ट मानले जाते आणि डेथ ओव्हर्समध्ये जॉर्डनची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. तो मुंबई संघातही सामील झाला आहे.
 
मुंबईने ट्विटरवर लिहिले - ख्रिस जॉर्डन उर्वरित हंगामासाठी मुंबई संघात सामील होईल. जोफ्रा आर्चरच्या जागी जॉर्डनने संघात स्थान मिळवले आहे. जॉर्डनने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 28 सामने खेळले असून 27 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. याशिवाय त्याने इंग्लंडकडून 87 टी-20 सामने खेळले असून त्याच्या नावावर 96 विकेट आहेत. जॉर्डनही शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करू शकतो.
 
मुंबईकडून खेळताना आर्चरने पंजाबविरुद्धच्या डावाच्या शेवटच्या षटकात २७ धावा दिल्या होत्या. यानंतर त्याच्या फॉर्म आणि फिटनेसबाबत चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पंजाबविरुद्धच्या सामन्यात आर्चरने चार षटकांत 56 धावा दिल्या होत्या. मात्र, हा सामना मुंबईने सहा गडी राखून जिंकण्यात यश मिळवले. मात्र, यानंतर आर्चरने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले आणि चार षटकांत 24 धावा दिल्या, पण त्याला एकही बळी घेता आला नाही. 
 



Edited by - Priya Dixit