शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

चेन्नई-मुंबई संघात आज प्ले ऑफची लढत

PR
21 मे रोजी येथील फिरोझशहा कोटला मैदानावर दोन तुल्बळ व बलवान संघात सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 प्ले ऑफ फेरीचा पहिला क्वालिफाईर सामना खेळला जात आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये वर्चस्वासाठी ही लढत होईल. चेन्नईचा संघ बलवान आहे तर मुंबईचाही संघ प्रबळ आहे. कागदावरती दोन संघामधील फरक दाखविण्यास थोडीच जागा आहे. दोन्ही संघाने 16 साखळी सामन्यांपैकी 11 सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने घरच्या मैदानावरील सर्वच आठ लढती जिंकल्या आहेत. चेन्नई संघाने घरच्या मैदानावर सहा सामने जिंकले आहेत. तरीही तंनी साखळी गुणतक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे.

PR
मुंबईने साखळी सामन्यामध्ये घरच्या मैदानावर व चेन्नईत चेन्नईला हरविले आहे. आता तटस्थ ठिकाणी हा सामना खेळला जात आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा कस लागणार आहे. दोन्ही संघ फलंदाजीवर अवलंबून आहेत. सचिन तेंडुलकरविरुध्द रविचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनीविरुध्द हरभजनसिंग, केरॉन पोलार्डविरुध्द मोहित शर्मा अथवा माईक हसी विरुध्द प्रगन ओझा असा सामना होऊ शकतो. तेंडुलकरच्या हाताची दुखापत बरी झाली आहे व तो या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. त्याने 14 सामन्यांतून 287 धावा केल्या आहेत. एकंदरीत ही लढत अटीतटीची होणची शक्यता आहे.