testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्रीशांत-चंडिलाचा तुरुंगातच झाला ‘राडा’

shrisanth and chandila
मुंबई| वेबदुनिया|
WD
‘अरे ए चंडिला, तूच मला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवले आहेस.. तुझ्यामुळेच माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.. बघून घेईन तुला.. सोडणार नाही..’

रागाने लालबुंद झालेला, संतापाने थरथरणारा एस. श्रीशांत त्वेषाने बडबडत होता. पोलीस चौकशीदरम्यान, अजित चंडिलाला समोर पाहताच त्याची साफ ‘सटकली’ होती. काय करू आणि काय नको, असे त्याला झाले होते. तर, श्रीशांतचे आरोप ऐकून चंडिलाही खवळला होता. अंगावर येणार्‍या श्रीशांतला शिंगावर घेण्यासाठी तो तयारच होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना एकमेकांपासून दूर केल्याने जेलचा आखाडा होता-होता राहिला.
ही गोष्ट आहे रविवार रात्रीची. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीशांत आणि अजित चंडिला यांना चौकशीसाठी एकत्र आणले, तेव्हा ‘ड्रामेबाज’ श्रीशांतचा स्वत:वरचा ताबा सुटला. दहा दिवस तुरुंगाची हवा खाऊन तो सैरभैर झाला होता. त्यातच कोर्टाने जामीन देण्याऐवजी त्याच्या कोठडीत वाढ केल्याने त्याचे डोके फिरले होते. नेमका त्याचवेळी चंडिला त्याच्या नजरेसमोर आला आणि मग सगळी भडास श्रीशांतने त्याच्यावरच काढली.
तुझ्यामुळेच मी अडकलो. तू माझे करिअर संपवले आहेस, आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस, मी तुला सोडणार नाही, असा हल्लाबोल श्रीशांतने चंडिलावर केला. अर्थात, चंडिलाचे चित्तही थार्‍यावर नव्हतेच. त्यामुळे श्रीशांतची ही ‘बकबक’ ऐकून त्याचाही पारा चढला. त्याने स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे बिल श्रीशांतवर फाडायला सुरुवात केली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर मारामारीत होण्याची चिन्हे दिसू लागली होती. चंडिला श्रीशांतच्या समोर जाऊनच उभा ठाकला होता. परंतु, त्याचा हा पवित्रा पाहून पोलिसांनी दोघांनाही दूर नेले आणि शांत केले. पोलिसांनी ‘खर्जातला आवाज’ दिल्यानंतर गप्प राहण्याशिवाय दोघांकडेही पर्यायच नव्हता. परंतु, तुरुंगाची हवा खाऊनही वाद घालायची श्रीशांतची सवय गेलेली नाही, हेच या ‘राडय़ा’तून स्पष्ट झाले आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार

national news
आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...

स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

national news
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

national news
नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...

100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू

national news
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...

तर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा

national news
सरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...