testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्रीसंतने मैत्रिणीसाठी खरेदी केला होता ’ ब्लॅकबेरी’

shrisanth
नवी दिल्ली| वेबदुनिया|
WD
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमधून कमावलेल्या पैशातून श्रीसंतने एका दिवसात सुमारे दोन लाखांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीसाठी ब्लॅकबेरी मोबाईलही खरेदी केला होता. पोलिसांनी श्रीसंतच्या जयपूर येथील एका मैत्रिणीच्या घरातून खरेदी करण्यात आलेले सामान जप्त केले आहे. यामध्ये ब्लॅकबेरी झेड १० आणि १.९५ लाख रूपयांचे कपडे मिळाले आहेत. श्रीसंतने हे सर्व सामान फिक्सिंगमधून मिळालेल्या कमाईतून केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. सामान जप्त करण्यासाठी श्रीसंतला जयपूर नेण्यात आले होते. आज (मंगळवारी) श्रीसंतचा आवाजाचा नमुनाही घेण्यात आला आहे. त्याच्यावर कलम ४०९ लावण्यात आला आहे. याअंतर्गत त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ
शकते.

श्रीसंतने काही मोठया क्रिकेटपटूंची नावे घेतली आहेत, ज्यांना बुकीज कायम महागडया भेटवस्तू देत असत. बुकीजने या खेळाडूंना हमर ही महागडी चारचाकी, महागडी घड्याळे त्याचबरोबर मुलीही पुरवल्या आहेत, अशी माहिती श्रीसंतने पोलिसांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजते. हे खेळाडू स्पॉट फिक्सिंगसाठी तयार व्हावेत म्हणून बुकीज असे करत होते. त्याचबरोबर बुकीजने राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना शॉपिंग करण्यासही दिली होती. त्याच प्रकरणात सध्या अटकेत असलेला चंदिलाने २.५ लाखांच्या दोन जिन्स पँट आणि महागडे घडयाळ खरेदी केले होते.
मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हवाला ऑपरेटर अवधेश पटेलकडे १.२८ कोटी रूपयांची रोकड मिळाल्याचे मुंबई पोलिसचे जॉर्इंट कमिशनर हिमांशु रॉय यांनी सांगितले. प्रेम तनेजा आणि वीरेंद्र दारासिंग रंधवा ऊर्फ विंदूला बुकींबरोबरच्या संबंधासाठी अटक करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

शाओमी आज रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो आज लाँच करणार

national news
शाओमी आज (17 जुलै) रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ...

'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा ...

national news
"फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन कुराणाच्या प्रती वाटण्याच्या ...

इमारत कोसळली, माणसं मृत्युमुखी पडली पण जबाबदारी कुणाची?

national news
"मी शेजारच्या इमारतीत राहतो. जेव्हा दुर्घटना घडली, तेव्हा मोठा आवाज आला. मी बाहेर पळालो, ...

मुंबईचे लोक किड्या-मुंग्यांसारखी मरू नयेत म्हणून या 9 ...

national news
मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ...

इच्छा नसतानाही महिला 'या' पाच कारणांमुळे रिलेशनशीपमध्ये ...

national news
आपुलकी, काळजी असो किंवा नको. पण, त्यांनी त्यांचं नातं टिकवावं अशीच सर्वांची अपेक्षा असते. ...