शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 3 जून 2008 (17:57 IST)

जयसूर्या आयपीएलचा 'सिक्सर किंग'

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघातील श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याने 'सिक्सर सिंग' चा मान मिळविला आहे.जयसूर्याने 14 सामन्यात 42.83 च्या सरासरीने 514 धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक 31 षटकार ठोकले.

त्याने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात नाबाद शतकी (114) खेळ करताना 11 षटकार मारले होते. स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या ब्रेडन मॅकुलनने 13 षटकार मारले होते. त्यानंतर जयसूर्याने सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

दुसर्‍या क्रमांकावर पंजाब किंग्ज इलेव्हन संघाचा सलामीवर शॉन मार्शने 11 सामन्यात 68.44 च्या सरासरीने सर्वाधिक 616 धावा केल्या त्यात 26 षटकारांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने शतकी खेळी करताना सात षटकार मारले होते.

तिसर्‍या क्रमांकावर आयपीएलचा बादशहा ठरलेल्या राजस्थान रॉयल्स संघातील आक्रमक फलंदाज युसूफ पठाण तिसर्‍या क्रमांकावर असून त्याने 16 सामन्यात 25 षटकार मारले होते. आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' च्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या पठाणने स्पर्धेत 31.07 च्या सरासरीने 435 धावा केल्या आहेत.

तर दिल्ली डेयर डेविल्सचा कर्णधार विरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवागने स्पर्धेतील 14 सामन्यात 21 षटकारांच्या मदतीने 33.83 च्या सरासरीने 406 धावा केल्या.