शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 12 नोव्हेंबर 2014 (13:18 IST)

175 वर्षापूर्वी काढला गेला पहिला सेल्फी

सध्या संपूर्ण जगभरात सेल्फीची क्रेझ आहे. पण आपल्याला माहितीय? सर्वात पहिला सेल्फी कधी काढला गेला? 1839 साली 30 वर्षीय रॉबर्ट कॉर्नेलियसनं जगातील सर्वात पहिला सेल्फी काढला होता. अमेरिकेच्या पेंसिलवेनियामध्ये असलेल्या कॉर्नेलियसनं फिलँडेल्फियात राहणार्‍या आपल्या वडिलांच्या दुकानामागे हा फोटो काढला होता. कॉर्नेलियसनं फोटोग्राफीमध्ये प्रशिक्षण आणि विशेषत्व: मिळविल्याच्या 20 वर्षापर्यंत आपल्या वडिलांच्या दुकानात काम केलं. त्यांची फोटोग्राफी कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी फोटोग्राफी कंपन्यांमध्ये एक आहे. कॉर्नेलियस यांचं 1893 मध्ये निधन झालं होतं.