सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (13:03 IST)

WhatsApp चा वापर बंद करणार 28 टक्के युजर्स

WhatsApp ला मोठा झटका बसला असून टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या ॲप्स चा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे ॲप डाऊनलोड करणार्‍यांची आणि वापरणाऱ्यांची संख्या यात कमालीची वाढ झाली आहे. व्हाट्सअपच्या नव्या पॉलिसीचा धसका अनेक युचर्सने घेतलेला पाहायला मिळत आहे. व्हाट्सअप च्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नव्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका व्हाट्सअपला बसला आहे कारण आता युजर्स व्हाट्सअपचा पर्याय असलेल्या तसेच युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असलेल्या अत्यंत सोप्या असलेल्या ॲप्स चा शोध घेत आहे.
 
सायबर मीडिया रिसर्च एका सर्व्हेनुसार 28 टक्के युजर्स आता व्हाट्सअप चा वापर बंद करणार असल्याचा विचार आहे तर काही असे आहेत ज्यांनी अजून यासंबंधी विचार केलेला नाही. WhatsApp आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2019 पासून लागू करणार होतं मात्र सध्या आहे काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. युजर्सकडून मिळालेल्या निगेटिव रिस्पॉन्समुळे कंपनीला आपली पॉलिसी मे 2021 पर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. कंपनी या दरम्यान युजर्सला पॉलिसी संबंधी अधिक चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 
 
नवीन पॉलिसी लागू करण्याच्या तारखेला निर्णय कंपनीला फायदेशीर ठरला आहे अन्यथा अनेक जण व्हाट्सअप सोडण्याचा विचार करत होते. सायबर मीडिया च्या रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार व्हाट्सअप आणि फेसबुक मेसेंजर हून जास्त सर्वर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. माहितीनुसार व्हाट्सअप आणि फेसबुक मेसेंजर 50 टक्के गुण जास्त जवळपास रोज मेसेज येतात. 
 
सायबर मीडियाच्या रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार व्हाट्सअप आणि फेसबुक मेसेंजर हून जास्त सर्व्हरवर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. माहितीनुसार व्हाट्सअप आणि फेसबुक मेसेंजर 50 टक्के गुण जास्त जवळपास रोज मेसेज येतात. सर्व्हेत भाग घेणाऱ्या यूजर्समध्ये 50% अनोळखी नंबरवरून संदिग्ध मेसेज मिळत होते. यात फिशिंग अटॅक वायरस वेल्डिंग असल्याचे देखील म्हटलं जात आहे. फिशिंग अटॅक साठी व्हाट्सअप पसंतीचे प्लॅटफॉर्म आहे. माहितीनुसार व्हाट्सअप वर फिशिंग अटॅकची शक्यता 52 टक्के आहे तर टेलिग्राम साठीही 28 शक्य आहे. सर्व्हेत भाग घेणाऱ्या यूजर्समध्ये 41 टक्के टेलिग्राम आणि 35 टक्के सिग्नल वर शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.
 
अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे की व्हाट्सअप अकाउंट डिलीट केल्यानंतर ही 90 दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. व्हाट्सअप यूजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेवू इच्छित असल्यास त्यांना अनइंस्टॉल नाहीतर डिलीट करावे लागेल. जर अकाउंट डिलीट केले नाही तर डेटा व्हाट्सअप कडेच राहील तसेच अकाउंट डिलीट केल्यानंतर ही 90 दिवसांपर्यंत युजर्स डेटा व्हाट्सअप कडेच राहील. व्हाट्सअप च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स नाराज होत आहे त्यामुळे अनेक जण आपल्या फोन मधून व्हाट्सअप थेट आणि इन्स्टॉल करत आहे मात्र हा योग्य पर्याय नाही दुसऱ्या होताना व्हाट्सअप अकाउंट डिलीट करणे आवश्यक आहे.