शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2014 (12:07 IST)

70 हजार पुस्तकांचे ‘ई-बुक्स’मध्ये रुपांतर

सध्याचे जग डिजिटल झालेले आहे. वर्तमानपत्र, नितकालिकासह पुस्तकेही नागरिक ऑनलाइन वाचू लागली आहेत. वाचकांची बदलती गरज लक्षात घेऊन गुजरातच ग्रंथालय संचालकांनी 70 हजार गुजराती पुस्तके ‘ई-बुक्त’मध्ये रुपांतरित केली आहेत. त्यामुळे ही पुस्तके वाचकांना कधीही वाचता येणार आहेत.
 
‘ई-लायब्ररी रीडर’ या सॉफ्टवेअरद्वारे वाचकांना संगणकावर आणि मोबाइलवर अँड्रॉइड अँपद्वारे ही पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. आतार्पत 70 हजार पुस्तकांची 1.95 कोटी पाने ई-बुक्समध्ये रुपांतरित केली आहेत. ही सर्व पुस्तके दोन महिन्यात वाचकांना ई-बुक्सद्वारे वाचायला मिळतील.
 
या उपक्रमात प्रत्येक पुस्तकाचे पान स्कॅन केले जाते. त्यानंतर ते पीडीएफमध्ये रुपांतरित केले जाते. हे पुस्तक केवळ वाचू शकतो. त्याची कॉपी करता येत नाही, असे ग्रंथालय विभागाच्या संचालक डॉ. वर्षा मेहता यांनी सांगितले. सेंट्रल लायब्ररी आणि स्टेट रिपोसिटरी सेंटर या दोन ग्रंथालातील ही पुस्तके आहेत.
 
यातील बहुतांशी पुस्तके ही दुर्मीळ व जुनी आहेत. पुस्तकाचे पान स्कॅन झाल्यानंतर ते डिजिटली स्वच्छ केले जाते. वाचकांना पुस्तक वाचताना अडचण वाटू नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. ही पुस्तके संगणक व मोबाइलवर वाचली जाऊ शकतात. मात्र, ई-बुक्स वाचताना वाचकांना ग्रंथालयाचे वातावरण जाणवावे याची काळजी घेतली आहे. ग्रंथालयात ज्याप्रमाणे पुस्तके मांडली जातात, त्याच प्रकारचे खास डिझाइन केले आहे. त्यामुळे वाचकांना ग्रंथालय असल्यासारखेच वाटते. ही ई-बुक्स आमच्या सर्व्हरवर अपलोड केला जातात. त्यानंतर वाचकांना ओळख क्रमांक व पासवर्ड दिला जातो. त्यामुळे वाचकांना पुस्तक वाचणे सोपे जाते. ही पुस्तके अँड्रॉइड अँपद्वारे ग्राहक मोबाइलवरही वाचू शकतात, असे मेहता यांनी सांगितले. 
 
आम्ही राज्यातील सर्व ग्रंथालातील पुस्तकांचे रुपांतर ई-बुक्समध्ये करणार आहोत. तसेच पुस्तकांचा डेटाबेस देणार आहोत. पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालयात वेळेअभावी जाऊ न शकणार्‍या वाचकांसाठी ही सोय केली आहे. या प्रकल्पामुळे वाचकांना दुर्मीळ पुस्तके वाचण्याचा आनंद मिळणार आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील,  डाउनलोड करण्यासाठी  येथे  क्लिक  करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.