testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आधारकार्डचा मोबाईलवर अॅक्सेस

Last Modified शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:22 IST)
सरकारने नुकतेच ‘एम आधारअॅप’ अपडेट केले आहे. जुलै महिन्यात हे अॅप्लिकेशन लाँच करण्यात आले होते. त्यानंतर या अॅपमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. या अॅपच्या माध्यमातून व्यक्ती आपले आधारकार्ड मोबाईलवर सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपात जवळ बाळगू शकते. वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून हे आधारकार्ड मोबाईलवर अॅक्सेस करता येणार आहे.

मोबाईलवर आधारकार्ड अॅक्सेस झाल्यास ते हाताळणे सोपे होणार आहे. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरीही अगदी सहजपणे हे कार्ड तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. याशिवाय विशिष्ट कालावधीसाठी असणारा ओटीपी टाकून नागरिकांना हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी ३० सेकंदाचा कालावधी देण्यात आलाय. प्रोफाईल ओपन केल्यावर पासवर्ड सुरक्षित ठेवला जाईल.यावर अधिक वाचा :